1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. machines-in-the-name-of-devi-devta-machines

देवी-देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्री जाहिरातीवर बंदी

machines
देवी-देवतांच्या नावानं यंत्र-तंत्र विक्री जाहिराती प्रसारित करण्यावर औरंगाबाद खंडपीठानं बंदी घातली आहे. जादूटोणा कायद्यानुसार यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिला आहे.  
 
प्रसारमाध्यमांत देवी-देवतांची नावे यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिराती प्रसारित करण्यात येतात. अशा प्रकारच्या यंत्राचे उत्पादन विक्री आणि प्रचार-प्रसार करणाऱ्यांविरोधात अघोरी कृत्य आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा तसेच या प्रकरणी कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली आहेत ? याची माहिती तीस दिवसात सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
पुढील लेख
मी परत येईन ऐवजी आता परत जायची वेळ आली आहे : निलम गोऱ्हे