सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (15:50 IST)

वर्षा राऊत यांची ईडीकडून पुन्हा चौकशी होणार

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सक्तवसुली संचलनालयाकडून पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठवले आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना 11 जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. 
 
यापूर्वी 4 जानेवारीला पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास वर्षा राऊत यांना प्रश्न विचारले होते. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.