संबंधित माहिती
- पंतप्रधान मोदींनी स्वीकारले तैवानच्या राष्ट्रपतींचे अभिनंदन, चीनने व्यक्त केला विरोध
- नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना सहभागी होणार आहेत
- मोदींना शुभेच्छा देताना कॅनडाच्या पंतप्रधानांकडून मानवाधिकार आणि विविधतेचा उल्लेख
- रविंद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर : निवडणुकीच्या निकालाला आव्हान देता येतं का? यापूर्वी असं झालं होतं?
- गाझामधल्या संयुक्त राष्ट्रांच्या शाळेवर इस्रायलचा हल्ला, किमान 20जणांचा मृत्यू
अग्निवीर, जातनिहाय जनगणना आणि बिहारला विशेष राज्याचा दर्जा याबाबत जेडीयूनं काय म्हटलं?
जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी अग्निवीर योजनेवर पुनर्विचार व्हायला हवा असं म्हणलं आहे.
तसंच देशात जातनिहाय जनगणना करावी आणि बिहारला विशेष दर्जाही द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे.
केसी त्यागी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "अग्निवीर योजनेबाबत काही मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. जनतेनं प्रश्न उपस्थित केल्यामुळं या योजनेच्या कमकुवत बाजूवर सविस्तर चर्चा व्हायला हवी,"असंही ते म्हणाले.
"जातनिहाय जनगणनेला कोणत्याही पक्षाचा विरोध नाही. पंतप्रधान मोदींनीही ते नाकारलेलं नाही. जातनिहाय जनगणना ही काळाची गरज आहे."
त्यागी म्हणाले की, "आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पण बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा. राज्य विभाजनानंतर बिहारची जी अवस्था झाली आहे, ती दूर करण्यासाठी बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यायला हवा."
भाजपला स्वबळावर बहुमत मिळण्यात यावेळी यश आलेलं नाही. पण भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीए आघाडीला 290 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाला आहे. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
पण जेडीयू 12 आणि टीडीपी 16 जागा जिंकत किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. सध्या हे दोन्ही पक्ष एनडीएचे घटकपक्ष आहेत.