1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जून 2024 (18:52 IST)

पंतप्रधान मोदींनी स्वीकारले तैवानच्या राष्ट्रपतींचे अभिनंदन, चीनने व्यक्त केला विरोध

पीएम नरेंद्र मोदींनी तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग यांच्या अभिनंदनाच्या संदेशावर आभार मानत प्रतिक्रिया दिली आहे. पण चीननं पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेवर विरोध व्यक्त केला आहे.
 
चीनची वृत्तसंस्था ग्लोबल टाइम्सशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग म्हणाल्या की, "तैवानच्या नेत्यांनी केलेल्या पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाबाबत चीन विरोध व्यक्त करत आहे. ज्या देशांचे चीनबरोबर राजकीय संबंध आहेत, त्यांच्या नेत्यांच्या तैवानच्या नेत्यांसी अधिकृत संवादाचा चीननं कायम विरोध केला आहे."
 
"जगात फक्त एकच चीन आहे. भारतानं वन-चायना संदर्भात गांभिर्यानं राजकीय कटिबद्धता दर्शवली आहे. त्यांनी तैवानच्या अधिकाऱ्यांच्या राजकीय धोरणांबाबत सतर्क राहायला हवं आणि वन चायना धोरणाचं उल्लंघन होणाऱ्या कोणत्याही बाबीपासून दूर राहायला हवं."
 
तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत माहिती दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या निवडणुकीतील विजयाबाबत अभिनंदन. आम्ही तैवान आणि भारतातील संबंध वाढवण्यासाठी तत्पर आहोत. आम्ही व्यापार, औद्योगिक आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठीही तयार आहे. "
 
पीएम मोदींनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद लाइ चिंग. मी आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भागिदारीच्या संदर्भात काम करण्याची आशा करतो."