1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 30 जुलै 2015 (10:53 IST)

कॅटरिनाच्या सौंदर्याचे राज?

katrina kaif beauty secret
बॉलिवूडमध्ये बार्बी गर्लचा खिताब मिळवणारी कॅटरिना कैफ आपले सौंदर्य जपण्यासाठी नेहमीच सतर्क असते. यासाठी मायकल जॅक्सन जे तंत्र वापरत होता तेच तंत्र कॅटरिनाही वापरते आहे. कॅटरिनाचे ब्युटी सीक्रेट समजले आहे. ती नियमितपणे ऑक्सिजन थेरपी घेते आहे. या थेरपीचे नाव हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) असे आहे, त्यासाठी कॅटरिनाला 20 हजार रुपये खर्च करावे लागतात. 
 
यात पेशंटला प्रेशराईज्ड चेंबरमधून शुद्ध ऑक्सिजन दिले जाते. उन्हामुळे त्वचेचे फार नुकसान होते. त्वचा पूर्ववत होण्यासाठी तसेच रंग निखारण्यासाठी या थेरपीचा उपयोग केला जातो. याच्या एका सिटिंगला 20 हजार रूपयांचा खर्च येतो. बॉलिवूडमध्ये आताच पाऊल ठेवणारी सुनील शेट्टींची मुलगी अथिया ही सुद्धा एचबीओटीची थेरपी घेते.