केशरयुक्त चहा
|
4 कप पानी, 1 छोटा चमचा चहापत्ती, अर्धा चमचा दालचिनी व इलायची पूड, 4 काप केलेले बदाम, 4 चमचे साखर, 16 दाने किसमिस, 8-10 केशराचे धागे, 4 छोटे चमचे लोणी.
पद्धती :
केशर आधी गरम पाण्यात भिजवण्यासाठी ठेवा. त्याचप्रमाणे मनुका देखील वेगळ्या पाण्यात भिजवण्यासाठी ठेवा. एका भांड्यात पाण्यात साखर टाकून उकळत ठेवा. पाण्याला चांगली उकडी आल्यानंतर त्यात चहापत्ती टाका.
जेव्हा चहापत्ती पाण्यात विरघळून जाईल तेव्हा चाळणीतून गाळून घ्या. नंतर त्यात मनुका, बदाम, इलायची पूड टाकून केशर भिजवलेले पाणी टाका. गरमा गरम केशरयुक्त चहा स्वत: प्या व घरातील इतरांनाही द्या.
