1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश स्तवन
  6. भूपाळी गणपतीची

Ganesh Utsav 2013, Ganesh Utsav Marathi Language | भूपाळी गणपतीची

भूपाळी गणपतीची गणेश महिमा
WD
उठा उठा हो सकळित। वाचे स्मरावा गजमुख।
ऋद्धिसिद्धींचा नायक। सुखदायक भक्तांसी।।धृ.।।
अंगी शेंदुराची उटी। माथां शोभतसे कीरिटी।

केशरकस्तूरी लल्लाटीं।
हार कंठीं साजिरा।।1।।

कानीं कुंडलांची प्रभा। चंद्र-सूर्य जैसे नभा।
माजीं नागबंदी शोभा। स्मरतां उभा जवळी तो।।2।।

कांसे पीतांबराची घटी। हातीं मोदकांची वाटी।।
रामानंद स्मरतां कंठीं। तो संकटीं पावतो।।3।।
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा