कांद्याच्या पातीचे सूप
- स्मिता
|
कृती : पातीचे कांदे पाण्यात शिजवून घ्यावे. चांगले शिजल्यावर कुस्करून गाळून रस काढावा. एका कढईत लोणी तापवून विरघळल्यावर त्यात कॉर्नफ्लॉवर घालून भाजून घ्यावे. नंतर त्यात दूध घालून शिजवावे. सारखे ढवळावे, गोळे होऊ देऊ नये. शिजल्यावर खाली उतरवावे व वरील पातीच्या कांद्याच्या रसात चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी व चांगले शिजवून ठेवलेले दूध घालावे व गरमच ठेवावे. सूप वाढावयाच्या वेळी त्यात तळलेले ब्रेडचे तुकडे टाकावे.
