कृती : ब्रेड स्लाईस लोणी लावून घ्या. स्लाईसचे लहान तुकडे करून पुडिंगच्या बाऊलमध्ये लावून घ्या. त्यावर साखर घाला. अंडी फेसलेले घाला. परत थोडी साखर घाला, दूधात कॉफी घालून ढवळून त्यावर ओता. वरून दालचिनी पूड घाला व अर्धा तास पुडिंग बेक करा. गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा व नंतर कॉफी व साय एकत्र करून त्यात साखर घालून ढवळून थंड झालेल्या पुडिंगवर घाला.