1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी

आपल्याला मृत्यूची भीती का वाटते ?

WD
जीवन जगल्यानंतर मनाला शांती मिळाली पाहिजे. परंतु असे होताना दिसत नाही. जीवन जगताना वय वाढू लागते आणि मृत्यू जवळ येऊ लागतो, तेव्हा मनात मृत्यूची भीती गडद होऊ लागते. खरे तर जीवन आणि मृत्यूचे स्वरूप दिवस आणि रात्रीसारखे आहे. दोन्हीही सत्य आहेत, परंतु दोन्ही एकाच वेळी दिसणे शक्य नाही. त्यामुळे आपल्याला केवळ जीवनच हवे हवे वाटते.

आपण जीवंत असताना अनेकांचे मरण पाहतो. जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते. शरीराचा त्याग करते. खरे तर आपण जीवन जगतो म्हणजे प्रत्येक क्षण आपण जगत असतो. पुढल्याच क्षणी आपण मागील क्षण सदासाठी हरवून बसत असतो. मागील क्षण समाप्त होत असते. समाप्त होणे म्हणजेच मृत्यू होय. मृत्यूचे अंतिम सत्य हेच आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाला समाप्त आणि सुरुवात या दोन्ही क्रिया एकाच वेळी चालू आहेत. आपल्याला केवळ जीवनच दिसते. मृत्यू पाहायची आपली इच्छा नसते. जाणीव विकसित करून जीवन जगले तर पश्चाताप करायची वेळच येणार नाही. भारतीय मनीषींनी याच विषयावर हजारो वर्षे साधना अर्थात संशोधन केले आहे. भगवदगीता, उपनिषदे यातून जगण्याचे शास्त्रच सांगण्यात आले आहे.

सार-या दु:खाचे मूळ भय आणि अतृप्त वासना होय. दु:खाला समाजाच्या सीमा आणि कधीही न संपणार-या भौतिक इच्छा जबाबदार आहेत. या दोन्हीमुळे आपण अशा रीतीने बंधनात असतो की प्रत्येक क्षणी आपण मरत असतो. पूर्णपणे जगायची कला न समजल्याने आपण मृत्यूच्या भयाने भयभीत होऊन जगत असतो. अशाने आपण वर्तमानही जगू शकत नाही आणि भविष्याचा वेधही घेऊ शकत नाही. यासाठी अध्यात्मशास्त्र आणि कर्म सिद्धांत समजून घेण्याला पर्याय नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा