1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जुलै 2015 (12:52 IST)

प्रभू प्रेमाची विलक्षणता

hindu dharma
ब्रह्मलीन स्वामी शरणानंद महाराज यांनी याबद्दल मार्मिक विवेचन केले आहे. प्रेमी बनल्याने साधक देवाच्या उपयोगी होतो. देवकेने शेवटी म्हटले की, देवाला मानव हृदाचे प्रेम इतके आवडते की, ते असीम, अनन्य, अपार, अखंड झाले की, देव प्रसन्न होतो. आणि त्याच्यात  कितीतरी पटीने वाढ होत असते. 
 
देवास जेवढे काही द्याल ते कितीतरी पटीने आपलकडे येत असते. त्यालाच परमात्मा संबोधले आहे. देव जर नैवेद्य खातच गेला तर लोक नैवेद्य दाखविण्याचे बंद करतील. या विश्वाचे स्वरूप ही असेच आहे. जर शेतात एक दाणा दिल्यावर एकच दाणा परत देईल, तर लोक शेतात पेरणे सोडून देतील; पण शेत कितीतरी पटीने ते परत करीत असते. याप्रमाणे दुसर्‍याबरोबर केलेले सद्व्यवहार पण कितीतरी पटीने आपल्याकडे येत असतात. त्याप्रमाणे भगवंताला समर्पित खूप पटीने आपल्याकडे येते. तर भगवंताला काय अर्पण करणार? आपण स्वत:च त्यास अर्पित व्हावे. माझे काही नाही हीच त्याची पूजा आहे. मला काही नको! भगवंत माझे मी भगवंताचा ही भावना म्हणजे खरी पूजा ठरते. 
 
आपण अशी पूजा करीत गेलो की, तेथे प्रभू प्रेमाची अभिव्यक्ती होते. गुरु म्हणतात प्रेमी आणि प्रेमास्पदचा नित्या विहार आहे. तेच प्रभू विश्वाचिये जीवन आहे. आपले प्रेम हे अविनाशी तत्व आहे, तर प्रेमास्पद पण अनंत तत्व आहे. 
 
दोन्ही चिन्मयतत्त्व आहेत. ते समकक्ष आहेत. परमेश्वराशी संबंध जोडले गेले की तेथे भक्ती मिळते. भक्ती एक मधुर रस आहे, सुंदर आहे की, तेथे निर्विशेष ब्रह्म अवतरित होत असते, प्रकट होते. तर तेथे ब्रह्म-जीव भावाची प्राप्ती होते. सर्व दु:खापासून निवृत्ती, चिरशांती, व मुक्ती असा रस आहे. तेथे जीव ब्रह्म भावाची प्राप्ती सहज होते. या ज्ञानाने जीव-ब्रह्मभावास मिळतो आणि केवळ विश्वासाने हा भाव सहज उत्पन्न होतो. म्हणून प्रेम रसाचे काम करीत असावे, येथेच जीवाचे सार्थक आहे. 
 
जगातील दु:ख, संकटे व आपदा यांना तत्काळ दूर करण्याचा हा सुलभ मार्ग आहे. पण याबद्दल यथार्थ मनन अत्यावश्यक आहे. असा हा प्रभू प्रेमाची विलक्षण अनुभव आहे. ही आपली भारती संस्कृतीची शिकवण आहे.