1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक निकाल 2019
  4. Shirdi lok sabha election result 2019

शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019 live results Shirdi lok sabha election result 2019

[$--lok#2019#state#maharashtra--$]
मुख्य लढत : शिवसेना – सदाशिव लोखंडे विरुद्ध काँग्रेस – भाऊसाहेब कांबळे
या मतदार संघात थोरत-विखे गटाचा प्रभाव आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून सदाशीव लोखंडे, तर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे रिंगणात आहेत. मात्र नगरमधील प्रसिद्ध थोरात-विखे वाद या मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसेल. कारण मुलासाठी नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने विखे पाटील नाराज आहेत. विरोधी पक्षनेते पदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांची नाराजी शिर्डी मतदारसंघातील निकालातून दिसून येईल का आणि थोरात आपली किती ताकद पणाला लावणार, हेही पाहावे लागणार आहे.
[$--lok#2019#constituency#maharashtra--$]
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.
 
पुढील लेख
नागपूर लोकसभा निवडणूक निकाल 2019 live results