1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09

कलमाडींची पुण्‍यातून उमेदवारी दाखल

सुरेश कलमाडी
पक्षांतर्गत विरोधानंतरही कॉंग्रेसकडून पुन्‍हा उमेदवारी पदरात पाडून घेण्‍यात यशस्‍वी ठरलेल्‍या सुरेश कलमाडी यांनी आज पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

कलमाडी यांच्‍या विरोधात भाजपाचे अनिल शिरोळे यांना उमेदवारी देण्‍यात आली आहे. शिरोळेंनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला असून यंदा लढत चुरशीची होण्‍याची शक्यता आहे.

याशिवाय पुणे लोकसभा मतदार संघातून रणजीत शिरोळे मनसेकडून तर डी. एस कुलकर्णी बसपाकडून मैदानात उतरणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याची अंतिम मुदत चार एप्रिल आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा