महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावला; हवामान विभागाने शेतकऱ्यांना खरीप पेरणीबाबत सल्ला दिला
मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. हवामान विभागाने १५ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवला आहे.
मान्सूनचा वेग मंदावल्याने लोकांना काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह राज्यात १५ जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि जनता मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, राज्यात दाखल होऊन चार दिवस उलटले तरी नैऋत्य मान्सूनची प्रगती झालेली नाही.
७ जून रोजी मान्सूनने कोकणात प्रवेश केला. मात्र, मान्सूनचा वेग आणखी मंदावला आहे. मान्सूनचे ढग हळू हळू पुढे सरकत आहे. संपूर्ण राज्य व्यापायला एक आठवडा लागू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ११ ते १८ जून दरम्यान पाऊस कमी राहील.
१८ जूननंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना खरीप पिकांची पेरणी करण्याची घाई न करण्याचा पुन्हा एकदा सल्ला दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ११ ते १८ जून दरम्यान राज्याच्या अंतर्गत भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र, १८ जूनपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढू शकते. हे हवामान जून महिन्याच्या अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
Edited By- Dhanashri Naik