HCL चा नवीन लॅपटॉप बाजारात
देशातील प्रमुख हार्डवेअर कंपनी एचसीएल इंफोसिस्टीमने तरुणांना आकर्षित करण्यासाठी मी ब्रांड नावाने एक अभियान सुरू केले असून, यासाठी तयार करण्यात आलेला लॅपटॉप बाजारात लॉंच केला आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणांमधील गतिशीलता पाहता हा लॅपटॉप त्यांच्यासाठी तयार करण्यात आला आहे. भारत हा तरुणांचा देश असल्याने भारतात या लॅपटॉपला चांगली मागणी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.