इंधन दरवाढ नाही- देवरा
पेट्रोलियम कंपन्यांना जरी दरवाढीचा फटका बसत असला तरी इंधन दरवाढ करण्यात येणार नसल्याचे आश्वासन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी दिले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्याने देशातील पेट्रोलियम कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर दरवाढीला सामोरे जावे लागत आहे.
मागील पंधरा दिवसांमध्ये या कंपन्यांना मोठा फटका बसल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याची मागणी या कंपन्यांनी केली आहे. या कंपन्यांची मागणी फेटाळून लावत देवरा यांनी तूर्तास देशात इंधन दरवाढ करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.