1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

गूगल देणार फुकटात जाहीरात

गूगल देणार फुकटात जाहीरात
गूगलने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी छोट्या उद्योगांना फुकटात जाहीरात देण्याची ऑफर दिली आहे. मध्यम उद्योगांनाही याचा फायदा देण्यात येणार असल्याचे गूगलने स्पष्ट केले आहे.

गूगलचे ऑन लाईन विक्री विभाग प्रमुख श्रीधर शेषाद्री यांनी दिलेल्या माहितीनुसार छोट्या आणि मध्यम उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारात ओळख मिळवून देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याने ही योजना आखण्यात आली आहे.

ऑन लाईन बुकिंग केल्यानंतर उद्योगांना 2500 रुपयांचे फ्री कुपन देण्यात येणार असून, या माध्यमातून ते जाहीरात गुगलवर देऊ शकतात.
About Writer
वार्ता