गूगलवर ''रेड ड्रॅगन'' नाराज
प्रसिद्ध सर्च इंजिन गूगलवर रेड ड्रॅगन अर्थात चीन सरकार नाराज झाले असून, सरकारने चीनमध्ये गूगलसाठी कडक नियम करण्याची तयारी सुरू केली आहे. बायदू हे चीनमधील प्रसिद्ध सर्च इंजिन असून, गूगलला टक्कर देण्यासाठी चीन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
चीनने मागील काही महिन्यांपासून अश्लील वेबसाइटवर कारवाई सुरू केली आहे. गूगलवर अशा प्रकारच्या साईट शोधणे सहज शक्यता असल्याचे चीन सरकारचे म्हणणे असून, सरकारच्या या सक्तीमुळे कंपनीचे चीन अध्यक्ष ली काई फू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असून, जॉन लिउ यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
चीन सरकारने आता गूगलवरील काही साईट्सवर कडक निर्बंध आणण्याची तयारी सुरू केली असून, याचा मोठा फटका गूगलला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पर्सनल कॉम्प्युटरवर 'ग्रीन डॅम' नावाचे सॉफ्टवेअर बसवणे सक्तीचे करण्यावर सरकार विचार करत असून, या माध्यमातून अश्लील साईट उघडूच शकणार नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
चीनमधील इंटरनेट क्षेत्रात बायदूची भागिदारी 61.6 टक्के तर गूगलची भागिदारी 29 टक्के असून, सरकारने गूगलवर निर्बंध लादल्यास याचा मोठा फटका गूगलला बसण्याची शक्यता आहे.