1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

जम्मूत वाढतेय बेरोजगारी

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या अथक प्रयत्नांनंतरही राज्यात 10 हजारांवर डॉक्टर, अभियंते बेरोजगारांच्या यादीत आहेत.

राज्य सरकारच्या रोजगार खात्याने ही आकडेवारी जाहीर केली असून, खात्याकडे नोंदणी नसलेल्या बेरोजगारांचीही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

रोजगार कार्यालयात मागील काही महिन्यांमध्ये 9904 डॉक्टर आणि अभियंत्यांनी नोकरीसाठी आपले नाव नोंदवले आहे.