अमरावतीत तरुणाने लग्नाला नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
अमरावतीत राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई नगर येथील स्टेट बँक कॉलनीमध्ये एका मुलीने पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मृताच्या भावाने केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी तरुणाच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना प्रेमप्रकरण आणि वैवाहिक वादातून घडली आहे.
मयत मुलीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून त्यांची बहीण ही आरोपी तरुणाला ओळखत होती. कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांच्या या नात्याची कुटुंबाला काहीच माहिती नव्हती.
काही दिवसाने तरुणाने तरुणीला लग्नासाठी नकार दिले आणि त्याचे वागणेही बदलले. त्याचे आणि तरुणीचे सतत वाद व्हायचे आरोपी मुलीचा मानसिक छळ करायचा. सततच्या भांडणांमुळे आणि कथित मानसिक छळामुळे तरुणी कंटाळली आणि तणावात गेली. तिच्या भावाने आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांत तक्रार दाखल केली.
४ ऑगस्टच्या रात्री तरुणाने मुलीच्या कुटुंबियांना फोन करून तरुणी आत्महत्या करण्याचे बोलत असल्याचे सांगितले. फोन येताच कुटुंबीय आणि नातेवाईक तात्काळ साई नगरमधील तरुणीच्या घरी पोहोचले.
तिथे पोहोचल्यावर कुटुंबीयांना ती पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.हे दृश्य पाहून कुटुंबीय हादरून गेले. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना कळवले. माहिती मिळताच, अमरावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
पोलिसांनी आवश्यक पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्या आहेत. या घटनेनंतर कुटुंब शोकात आहे. प्रकरणाची परिस्थिती निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Edited By - Priya Dixit
