गडचिरोलीत आश्रम शाळेत झोपलेल्या ३ विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू
गडचिरोली येथील आश्रम शाळेत झोपलेल्या ३ विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला असून ३ जण गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये विषारी सर्पदंशामुळे तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धनोरा तालुक्यातल्या एका शासकीय अनुदानित निवासी आश्रम शाळेत दुपारच्या जेवणानंतर जमिनीवर झोपलेल्या तीन निष्पाप विद्यार्थिनींना सर्पदंश झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, शाळा प्रशासनाने सर्व विद्यार्थिनींना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तीन जणींचा मृत्यू झाला.तर इतर तीन विद्यार्थिनी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्पदंशाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांनी मागणी केली आहे की, आश्रम शाळांनी मुलांना जमिनीवर झोपण्याची प्रथा बंद करून त्यांना पलंग उपलब्ध करून द्यावेत आणि परिसरात कीटकनाशके व प्रतिविषाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावी.
Edited By- Dhanashri Naik