पिंपरी-चिंचवडमध्ये एका सोसायटीत खेळत असताना चिमुकलीला कारने चिरडले
महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सेक्टर १२ परिसरातील एका सोसायटीत खेळत असलेल्या एका लहान मुलीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने चिरडले. ही अंगावर काटा आणणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना सेक्टर १२ मधील एका निवासी सोसायटीचे पार्किंगमध्ये घडली आहे. लहान मुलगी पार्किंग परिसरात तिच्या खेळण्यातील स्कूटरवरून फिरत असताना, बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या एका चालकाने तिला धडक दिली. अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिची प्रकृती चिंताजनक आहे. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यापासून, कार चालकाविरोधात लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच, भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नसली तरी, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी प्रत्यक्ष चौकशी सुरू केली आहे. मुलीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे एक पथक रुग्णालयात दाखल झाले आहे.
Edited By- Dhanashri Naik