राहणीमान बदला नि निरोगी व्हा!
PR
PRफिरतांना जोराने श्वासोश्वास घ्यावा:
सकाळी अथवा संध्याकाळी फिरायला जाण्याची सवय स्वत:ला लावली पाहिजे. ते आरोग्यासाठी उत्तम असते. फिरताना जोरजोराने श्वासोश्वास घेतल्यास तुम्ही फक्त हृदयाच्या रोगांपासून दूर राहाल तर सदैव यौवन युक्त राहाल. यासाठी फिरायला जाताना आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल. जेव्हा श्वास घेताना सहजता पूर्वक श्वास नाकाच्या आत घ्यावा आणि जेव्हा श्वास सोडाल तेव्हा तोडांतुन जोराने फुंक मारत बल देवून जास्तीत जास्त श्वास बाहेर काढावा. तोडांने अधिक बल देऊन श्वास सोडल्यानंतर जेव्हा तुम्ही तोंड बंद करून नाकानी श्वास सहजच आत घ्याल तर तो श्वास स्वत:च मोठा असेल. जोराने घेतलेला श्वासामुळे फेफंडेद्वारे रक्तकोष व तसेच मस्तिष्क जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळते. तसेच अनावश्यक पाणी व गॅससारखे तत्त्व नष्ट होतील. त्यामुळे संपूर्ण शरीर शुध्द आणि ताजेतवाने बनते.
हृदय आणि मस्तिष्क रोगापासून बचाव:
दक्षिणेकडे पाय करून झोपल्यामुळे हृदय तसेच मस्तिष्कांचे रोग होतात. दक्षिण, धृवापर्यंत विजेची लहरे चालू असतात. उत्तरी धृवात धनात्मक विज असते. या प्रकारे व्यक्तीच्या डोक्यामध्ये विद्युतचे धनात्मक केंद्र असते. जर वीज एकाच प्रकारची दोन्हीकडून समोरासमोर येत असेल तर एकमेंकांना मिळत नाही तर एकमेंकांपासून दूर होते. जर तुमचे डोके दक्षिणेकडे असेल तर डोक्याची धनात्मक आणि ध्रुवाची ऋणात्मक वीज एक दुसर्याच्या समोर गेल्यामुळे एक गती प्राप्त होत असते. त्यामुळे अनेक लाभ होतात. हृदय आणि मस्तिष्काचा आजारापासून बचाव होतो. झोप चांगली आणि ताजेतवाने करणारी असते. स्वप्नही कमी पडतात.
जर दक्षिणेकडे पाय ठेवून झोपने संभव नसेल तर पूर्व दिशेकडे डोके ठेवून झोपु शकता. कारण सुर्याची प्राणशक्ती शरीरामध्ये चांगला प्रभाव टाकते. डोकेदुखी आणि डोक्याचे विकार होत नाहीत. शांत व सुखमय झोप लागते.
पोटाच्या रोगापासून बचाव:
जेवन खुप चावुन चावुन आणि भुकेपेक्षा कमी तसेच ठरलेल्या वेळेत केल्यास अपचन तसेच पोटाचे विकार होत नाहीत. सोबत पचनक्रिया चांगली होते. जेवन केल्यानंतर पोटावर झोपुन आठ वेळा श्वासोश्वास घ्यावा. मग उजवीकडे पलटून सोळा वेळा श्वासोश्वास घ्यावा. यामुळे भोजन लवकरच पचते. थांबलेली हवा तोंडातून डकारद्वारा त्याच वेळेस निघून जाते.
दात, गळ आणि आतड्या स्वस्थ ठेवण्यासाठी:
खुपच थंड अथवा खुपच गरम पदार्थ तसेच जास्त मसालेवाले पदार्थ खाणे टाळावे. तोंडाचे जितके तापमान असेल त्यापेक्षा जास्त गरम पदार्थ किंवा पेय, जसे चहा, कॉफी तसेच थंड पदार्थ बर्फ, कुल्फी आदींमुळे दात खराब होतात. गरम जेवन केल्यानंतर एकदम थंड्या पाण्याने गुळण्या करू नये. त्यामुळे गळा खराब होण्याची शक्यता असते. तोंड शुध्दी सकाळ, संध्याकाळ किंवा भोजनानंतर अवश्य करावी. यामुळे दंतावली अधिक काळपर्यंत स्थायी आणि निरोगी राहते.
चांगल्या प्रकारे झोपावे:
कड पलटून चांगल्याप्रकारे उशी डोक्याखाली घेवू झोपण्याची सवय लावावी. सरळ झोपल्यामुळे हवेचे छातीवर वजन पडते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. घबराहट व बैचेनी वाढते. झोप चांगली येत नाही आणि अंग-अंग दुखते. कडावर झोपल्यास असे होत नाही. उशी न घेतल्यास व्यक्ती हाताची उशी करून झोपतो. त्यामुळे हाताच्या नसा दाबल्या जातात. हातामध्ये सुलपन, मानेमध्ये सवाईकल स्पोंडिलाइसिस आणि शरीरात दुखने वाढते. उशी घेवून कडेवर झोपल्यास नस- नाडीमध्ये विकृती येत नाही. ज्यामुळे हातामध्ये सुन्नपणा तसेच मान, हात, कोहनी, कंबर, गुडघे आदीमध्ये त्रास होत नाही.
योग्य प्रकारे अंघोळ करावी:
ताज्या पाण्याने अंघोळ करावी. यामुळे सर्दी खोकला होत नाही. अंघोळ करताना सर्वात प्रथम पाणी डोक्यावर न टाकता प्रथम शरीराच्य उजव्या बाजुने खांद्यावर टाकावे. यामुळे रक्तसंचार चांगल्याप्रकारे होते आणि थंडीपासून होणार्या रोगापासून बचाव होतो. जर पाणी थंड असेल तर त्यामध्ये थोडे गरम पाणी टाकून कोमट करावे.
चालण्याची योग्य पध्दत:
* नेहमी योग्य प्रकारे पाऊल टाकून स्वाभाविक गतीने चालावे.
* योग्य गतीने चालण्यासाठी नेहमी योग्य मापाचा बुट, चप्पल अथवा सॅन्डल घालावे.
* ड्रेसची फिटींग योग्य नसलामुळे पण चाल बिघडते. त्यामुळे नेहमी योग्य फिटींगचे कपडे वापरावे.
* मनाला प्रसन्न ठेवून चालावे. जर आपली चाल चांगली असेल तरी तणावमुळे ती बिघडून जाईल.
* आरामाने आपली चाल संतुली ठेवीत चालने चांगले राहते.
* मनामध्ये भय किंवा घबराहट असल्यास पण चाल खराब होते. याला दूर करून आत्मविश्वासाने चालावे.
(साभार- योगसंदेश)
