- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
बंडोपंताविरूद्ध फिर्याद!
बंडोपंतांनी रस्त्यावरून जाताना एका माणसाच्या थोबाडीत मारली. काय कारण झाले कुणास ठाऊक? तो माणूस काहीतरी बडबडला. बंडोपंताला वाटले की, तो आपल्यालाच उद्देशून बोलला असावा. कारण बंडोपंतांचा स्वभाव फारच रागीट व माथेफिरू होता. तेव्हा त्या माणसाने बंडोपंताविरूद्ध फिर्याद केली. कोर्टाने चौकशी करून बंडोपंतांना 50/- रुपयांचा दंड केला.बंडोपंतांनी मोठ्या ऐटीतून आपल्या खिशातून 100/- रुपयांची नोट काढून कोर्टापुढे ठेवली. कोर्टाचा शिरस्तेदार म्हणाला, 'इथे आमच्याजवळ शंभर रुपयांची मोड नाही. आपण पन्नास रुपये थोड्या वेळाने भरा.'' बंडोपंतांकडे काही मोड नव्हती. ते कोर्टाला म्हणाले, 'ही शंभर रुपयाची नोट आपल्याजवळ ठेवून घ्या, मला परत मोड देण्याची जरूरी नाही. असे म्हणून बंडोपंत त्या फिर्यादी माणसाजवळ गेले आणि कोर्टासमक्ष त्याच्या आणखी एक मुस्काटात लगावली आणि कोर्टातून निघून गेले.