एक सुंदर तुरुणी मैदानावर जवानांची कवायत अगदी जवळून पाहत होती. तेवढ्यात शिकाऊ पथकाने गोळीबार सुरू केला. गोळीबाराच्या आवाजाने घाबरून त्या तरुणीने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि नेमकी ती बाजूला उभ्या असलेल्या एका तरुण अधिकार्यांच्या बाहुपाशात पडली. ती म्हणाली, ''ओह, माफ करा. मी बंदुकीच्या आवाजाने घाबरले. त्यामुळे असे घडले.'' यावर तो अधिकारी म्हणाला, ''काही हरकत नाही, आपण पलीकडे जाऊन तोफेचे प्रात्यक्षिक बघू.''