बासरची श्री महासरस्वती
- महेश जोशी
|
|
जीवसृष्टीमध्ये ज्ञानामुळेच माणूस श्रेष्ठ आहे.
मंदिरासमोरच्या टेकडीवर अगदी जवळच महर्षी व्यासांनी महालक्ष्मी आणि महाकालीची प्रतिष्ठापना केली आहे. म्हणजे या पवित्र क्षेत्री श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्री महालक्ष्मी या त्रिगुणात्मक महाशक्तीची महर्षी व्यासांनी प्रतिष्ठापना करून अखिल मानव जाधव जातीचं कल्याण केलं, या जगन्माऊलीच्या दर्शनानं आयुष्यातील दुःख, संकट संपून मनाला सात्विक समाधान लाभते. म्हणून शेकडो माणसं इथे अनुष्ठान करतात. अन्य शक्तीपीठात भक्तगण प्रामुख्याने नवरात्रात घटी बसतात, अनुष्ठानं करतात पण बासर येथील सरस्वती मंदिरात अखंड सप्तशतीचं पाठ चालू असतात. अनेक सत्पुरुषांनी, संतमहंतांनी चा पवित्र क्षेत्री अनुष्ठानं केल्याची नोंद सापडते.
|
देशभरात देवीची ५१ शक्तीपीठे आहेत. त्यात बासर येथील श्री महासरस्वतीचं स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्ञान हाच माणसाचा खरा अलंकार आहे. जीवसृष्टीमध्ये ज्ञानामुळेच माणूस श्रेष्ठ आहे. सरस्वतीच्या आशीर्वादाने माणसाच्या आयुष्याचं सोनं होतं, कविकुल गुरू कालिदास याचं उदाहरण आहे. नवरात्र महोत्सवात हा परिसर माणसांनी फुललेला असतो, देवीची महापूजा, मंत्रघोष, सप्तशतीचे पाठ, भजन, आरती आणि जयघोषांनी वातावरण नुसतं आनंदानं ओसंडत असतं, धूप-दीप गंधांनी मन प्रसन्न होतं, शेकडो भक्त घरी बसलेले असतात दसर्याच्या दिवशी श्री महासरस्वतीची पालखीतून गावभर मिरवणूक निघते, सारे रस्ते झाडून सडा शिंपडून सुंदर रांगोळ्यांनी रेखाटलेले असतात. तर माय माऊली दारासमोर जरीकाठी नेसून हातात पंचारती घेऊन मोठा प्रसन्न मनानं उभ्या असतात. औक्षण अन् फुलं उधळल्यानंतर पालखी हळूहळू पुढे सरकते. गावभर नुसता आनंदोत्सव असतो.
|
| |
|
|
या कुन्देंदुतुषार हार धवला या शुभ्र वस्त्राव्रता।
या वीणावरदण्डमंडित करा या श्वत पद्मासना॥
या ब्रम्हाच्युतशंकर प्रभूर्तिभिः देवैः सदा वंदिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाडा पहा॥
|
विद्यां देहि सरस्वती बुद्धिं देहि सरस्वती।
ज्ञानं देहि सरस्वती मुक्ति देहि सरस्वती॥
|
