1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

गोपाळकाल्याचा प्रसाद.

२ वाटी ज्वारीच्या लाह्या, १ वाटी दूध, पाऊण वाटी साय, २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीपुरती साखर, अर्धा चमचा जीरे, १ वाटी दही.

कृती : ज्वारीच्या लाह्यांमध्ये दुध, दही अन साय एकत्र करुन कालवावे. त्यात हिरवी मिरची, जीरे अन कोथिंबीर हे तीन पदार्थ एकत्र वाटून घालावे, चिमूटभर साखर घालावी अन सर्व नीट मिसळून घ्यावे.
मिरची, दही, साय यांचे प्रमाण आवश्यकतेनुसार कमी करावे. ज्वारीच्या लाह्या नसतील तर पोहे चालतील.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा