चिली चीज टोस्ट
साहित्य : ब्रेड, चीज (वड्या), आले, हिरवी मिरची, मिरपूड, पुदिन्याची पाने
कृती : सर्वप्रथम ब्रेड स्लाइस दोन्ही बाजूने प्रत्येकी ५-६ मिनिटे सोनेरी रंगावर भाजुन घ्याव्यात.
ब्रेड स्लाइस वर बारिक खिसणीने चिज खीसून पसरवावे. त्यावर आले खीसावे, मग मिरचीच्या अगदी पातळ चकत्या पसरवाव्यात, शेवटी मिरपूड भूरभूरावी. वर चार पाच पुदिन्याची पाने ठेवावित व पुन्हा थोडे चिज खीसून पसरवावे. आता मिश्रण असलेली बाजु वर ठेवून साधारण ५ मिनिटे भाजावी.
