संबंधित माहिती
- कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी; रत्नागिरी येथून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार
- उत्पन्नात घट होण्याची शक्यता, हे वर्ष शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली
- यवतमाळमध्ये मासिक वेतनाच्या मागणीसाठी परिचारिकांचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- LIVE: यवतमाळमध्ये मासिक वेतनाच्या मागणीसाठी परिचारिकांचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- २५ जूनपर्यंत मान्सून मुंबईत पोहोचण्याची शक्यता, एनडीआरएफ पथके तैनात
मुंबईकरांची 'लाईफलाईन' अधिक सुकर होणार; 'जोगेश्वरी टर्मिनस' उभारण्याचे काम वेगाने सुरू
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला गती देणारा आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांची डोकेदुखी कमी करणारा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गेम-चेंजर प्रकल्प असून सध्या मुंबईत लांब पल्ल्याच्या गाड्यांचा संपूर्ण भार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवर आहे. यामुळे दक्षिण आणि मध्य मुंबईतील स्थानकांवर प्रचंड गर्दी होते. 'जोगेश्वरी टर्मिनस' यावर एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता मुंबईत आता नवे 'जोगेश्वरी टर्मिनस' उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे मेट्रो आणि लोकल रेल्वेची थेट जोडणी होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. तसेच मुंबईतील रेल्वे वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर नव्या 'जोगेश्वरी टर्मिनस' उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले असून, जानेवारी २०२७ पर्यंत हे टर्मिनस प्रवाशांसाठी पूर्णपणे खुले होण्याची शक्यता आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या संपूर्ण टर्मिनसच्या उभारणीसाठी सुमारे ₹७६.८४ कोटी खर्च केले जात असून जुन्या डिझाइनमधील ३ फलाटांऐवजी आता येथे ४ फलाट बांधले जाणार आहे, ज्यामध्ये चौथ्या फलाटाचा वापर 'होम प्लॅटफॉर्म' म्हणून होईल. तसेच हे टर्मिनस एका दिवसात २४ डब्यांच्या गाड्या हाताळू शकेल. तर येथे वंदे भारत गाड्यांसाठी कोचिंग डेपोही असणार आहे. ज्यामुळे वांद्रे, दादर आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा आणि प्रवाशांचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच हे टर्मिनस मेट्रो मार्ग ६ आणि ७ शी हे थेट जोडले जाईल.
तसेच बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी परिसरातील प्रवाशांना आता लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी मुंबई सेंट्रल किंवा दादरपर्यंत दक्षिण मुंबईत जाण्याची गरज पडणार नाही. त्यांचा प्रवासाचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतील.
Edited By- Dhanashri Naik
