संबंधित माहिती
- अजित पवारांच्या जवळच्या सहकाऱ्याने खुलासा केला आहे की राष्ट्रवादीचे दोन्ही गट लवकरच विलीन होणार होते
- सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी-बार्शी रस्त्यावर भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू
- गोदामात अग्नितांडव; 7 जणांचा मृत्यू
- विमान अपघातांचे बनावट व्हिडिओ बनवून ते व्हायरल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी असा धडा शिकवला
- नाशिकमध्ये बस आणि पिकअपची धडक, 5 जणांचा मृत्यू
धुक्यामुळे ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, चार जणांचा मृत्यू
ग्वाल्हेरमध्ये एका भयानक अपघातात चार जणांचा मृत्यू. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली, ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक भयानक अपघात झाला. शुक्रवारी सकाळी ट्रक आणि कारची समोरासमोर टक्कर झाली, त्यात चार जण जागीच ठार झाले. वृत्तानुसार, कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे. ट्रक जप्त करण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास महाराजपुरा येथील ग्वाल्हेर-भिंड महामार्गावरील बरेठा टोल प्लाझाजवळ ही घटना घडली. अपघाताच्या वेळी परिसरात दाट धुके पसरले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आणि कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. महाराजपुरा पोलिस स्टेशनचे अधिकारी यशवंत गोयल यांनी सांगितले की, अपघातात मृत्युमुखी पडलेले चारही जण भिंड जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठवले.
Edited By- Dhanashri Naik