बुधवार, 11 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 जानेवारी 2026 (16:11 IST)

कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

indigo
कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बची धमकी दिल्याने खळबळ उडाली, खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. टिश्यू पेपरवर लिहिलेली धमकीची चिठ्ठी आढळली.
 
गेल्या काही काळापासून विमान कंपन्यांना वारंवार धमक्या मिळत आहे. दरम्यान, शुक्रवारी कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्ब आणि अपहरणाची धमकी मिळाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अहमदाबाद विमानतळावर विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
वृत्तांनुसार, विमानाचे अपहरण करून बॉम्बने उडवण्याची धमकी टिश्यू पेपरवर लिहिलेल्या चिठ्ठीत देण्यात आली. त्यानंतर, सर्व १८० प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली आणि प्रत्येक प्रवाशाची ओळख पडताळली जात आहे. विमानाने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर (SVPIA) सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले.
धमकीची चिठ्ठी मिळाल्यानंतर सुरक्षा संस्था तात्काळ सक्रिय झाल्या. विमानतळ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. विमानतळ पोलिस ठाण्यानुसार, बॉम्ब पथकाने विमानाची कसून तपासणी केली आहे. सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे आणि प्रोटोकॉलनुसार पुढील तपास सुरू आहे. 
Edited By- Dhanashri Naik