संबंधित माहिती
- उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस संघर्षात मुंबई मेट्रो-3 अनिश्चित काळासाठी रखडणार?
- मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर १० वातानुकुलित लोकल गाड्या धावणार
- कोरोना लस : भारतात कुठे, कशी मिळेल? केंद्र सरकारची नियमावली जाहीर
- ठाकरे सरकार भटक्या, विमुक्त जाती-जमातींविरोधात : पडळकर
- UPSC Recruitment 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
'किमान समान कार्यक्रमावरच सरकार चालवा', सोनिया यांचे ठाकरे यांना पत्र
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकारच्या कामाबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्याचे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या कामाबद्दल चार प्रमुख सूचना केल्या आहेत. किमान समान कार्यक्रमावर भर देण्याचा आग्रह चार प्रमुख गोष्टींवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या परिपत्रकात 'किमान समान कार्यक्रमावरच सरकार चालवा', असे नमुद केल्याचे म्हटले आहे. याबाबत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिल्याचे म्हटले आहे. सरकारच्या कामाबाबत उद्धव ठाकरे यांना सूचना करताना किमान समान कार्यक्रमावरच सरकार चालविण्याचे सांगताना दलित, आदिवासी, ओबीसींना जपण्याचे आवाहनही केले आहे.