शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (08:48 IST)

ठाकरे सरकार भटक्या, विमुक्त जाती-जमातींविरोधात : पडळकर

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे भटक्या, विमुक्त जाती-जमातींविरोधातील सरकार आहे, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. धनगर आरक्षणाबाबत पडळकर त्यांनी  पारंपरिक वेशभूषेत हटके पद्धतीने ढोल बजाओ आंदोलन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
 
पडळकर म्हणाले, वारंवार विनंती आणि आंदोलने करुनही सरकार धनगर आरक्षणाबाबत गंभीर नाही. सरकार जर आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नसेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आंदोलनासाठी मी लाखो लोक जमवू शकतो. पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते करु  इच्छित नाही. पण सरकार याबाबत गंभीर नाही म्हणून मला स्वतःला विधानभवनाबाहेर विविध 16 मागण्या घेऊन आंदोलन करावे लागले.