रविवार, 7 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (08:26 IST)

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर १० वातानुकुलित लोकल गाड्या धावणार

mumbai- 10 air conditioned
मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर आजपासून १० वातानुकुलित लोकल गाड्या धावणार आहेत. या मार्गावर केवळ अधिकृत परवाना असलेल्या प्रवाशांनाच प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचं सविस्तर वेळापत्रकही मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे.  
 
मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर सध्याच्या सेवेऐवजी उद्यापासून १० वातानुकुलीत लोकल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सोमवार ते शनिवार या दिवशीच या गाड्या धावणार असून प्रत्येक स्थानकात त्या थांबतील. तसेच रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच या मार्गावरुन प्रवास करता येणार आहे. दरम्यान, प्रवासादरम्यान करोनाच्या सर्व नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.