बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (08:42 IST)

भारत बंद दरम्यान मुंबईत बेस्ट आणि टॅक्सी रस्त्यांवर धावणार

भारतातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिलीय. यामध्ये एपीएमसी मार्केट देखील सहभागी होणार असून भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे. सोबतत माथाडी कामगार देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. 
 
दरम्यान भारत बंदमध्ये बेस्ट बसेस सहभागी होणार नाहीत. बेस्ट प्रशासनाने याबद्दल माहिती दिली. तसेच टॅक्सी देखील रस्त्यावर नियमित धावतील असे टॅक्सी युनियनने स्पष्ट केलंय.  बेस्ट बसेस उद्या रस्त्यांवर धावतील. त्या भारत बंदचा भाग नसतील असे बृहन्मुंबई वीज आणि वाहतूक विभागाने सांगितले. बसेच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहेत. बसच्या खिडक्यांवर लोखंडी जाळ्या आणि इतर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल असेही बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलंय.