चाणक्य नीती : अशा ठिकाणी कधीही निवारा घेऊ नका
आचार्य चाणक्य खूप विद्वान होते. त्यांनी तक्षशिला कडून शिक्षण घेतले आणि तेथे शिक्षक म्हणून काम ही केले. चाणक्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्येच्या जोरावर चंद्रगुप्तला सम्राट केले. आचार्य चाणक्यांनी अनेक शास्त्रांची रचना केली. त्यापैकी अर्थशास्त्र निर्मितीमुळे चाणक्य कौटिल्य म्हणवले.
आचार्य चाणक्यांनी लिहिलेला नीतिशास्त्रात अनेक महत्त्वाचा गोष्टी सांगितल्या आहेत जे मानव जीवनासाठी महत्त्वपूर्ण असतात. या गोष्टींना आपल्या जीवनात अनुसरणं करून व्यक्ती एक यशस्वी, सुखी आणि समृद्ध जीवन जगतो. चाणक्यांनी अशा काही जागा सांगितल्या आहेत जिथे माणसांनी कधीही राहू नयेत.
चाणक्य म्हणतात की अशा जागी राहू नये जिथे रोजगाराची साधने उपलब्ध नसतील, कारण जीवन जगण्यासाठी रोजगार असणे खूप महत्त्वाचे आहे.
चाणक्याच्या नीतीनुसार अशा जागी कधी वास्तव्यास नसावे जेथे मूर्ख लोक राहतात. अशा जागेचे त्याग करावे, कारण मूर्ख लोकांसह राहण्यापेक्षा एकटेच राहणे अधिक चांगले. आपण नेहमी अशा ठिकाणी राहावे जेथे बुद्धिमान लोक राहतात.
चाणक्यांच्या मते, अशा जागी कधीही राहू नये ज्या ठिकाणी लोक चुकीचा व्यवहार करतात, चुकीची कामे करतात, नशा करणे आणि इतर अनेक प्रकारच्या गैरवर्तन करत असलेल्या ठिकाणी कधीही वास्तव्य करू नये, कारण माणसावर संगतीचा खूप परिणाम होतो. म्हणून, ज्या ठिकाणी वाईट व्यवहार किंवा वाईट संगत करणारे लोक असल्यास त्या जागेचा त्वरितच त्याग करावा.
चाणक्याच्या मते, जिथे लोकांमध्ये लाज नाही, तेथे कधीही राहू नये, कारण एखाद्याचा सन्मान करण्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये लाज असणे फार महत्त्वाचे आहे. ज्या लोकांमध्ये लाज नसते, गर्विष्ठपणा असतो ते कोणाचाही आदर करू शकत नाही.