सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (13:05 IST)

लक्ष्मी पूजनात अशी असावी लक्ष्मीची मूर्ती

दिवाळीचा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. सहा दिवसाचा हा सण वसुबारसेपासून सुरू होऊन भाऊबीजेला संपतो. आनंद आणि सुखाची इच्छा घेऊन या दिवशी संपत्ती, ऐश्वर्य, सौख्याची देवी लक्ष्मी आणि रिद्धी-सिद्धीचे प्रदाता श्री गणेशाची पूजा इतर देवी देवांसह केली जाते. घर किंवा आपल्या कार्यस्थळी धनाची देवी आई लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या वर नेहमीच राहो, किंवा पूजा केल्याचे लाभ मिळत राहो या साठी महत्त्वाचे आहे की आपण सर्वानी दिवाळीची पूजा खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तिभावाने करण्यासह वास्तूच्या नियमांना लक्षात ठेवून योग्य पद्धतीने पूजा करावी. 
 
चला जाणून घेऊ या दिवाळीवर लक्ष्मीच्या पूजेसह इतर देवांची पूजा कोणत्या दिशेला करणे शुभ असतं. 
* उत्तर दिशेला वास्तूमध्ये धनाची दिशा म्हटले आहे म्हणून दिवाळीवर ही दिशा यक्ष साधना, लक्ष्मी पूजन आणि गणेश पूजनासाठी आदर्श जागा आहे. 
* आरोग्याच्या उत्तर - उत्तरपूर्व दिशेला भगवान धन्वंतरी, अश्विनीकुमार आणि नद्यांची उपासना केल्यानं उत्तम आरोग्य आणि सुखाची प्राप्ती होते. 
* देवी आई आणि मारुतीची पूजा दक्षिण दिशेला, उत्तर-पूर्व दिशेला शिवाचे कुटुंब, राधा आणि कृष्ण पूर्व दिशेला, श्रीराम दरबार, भगवान विष्णूंची उपासना आणि सूर्याची उपासना केल्याने कुटुंबात सौभाग्य वाढतं.
* शिक्षेची दिशा पश्चिम- दक्षिण -पश्चिम मध्ये विद्येची देवी आई सरस्वतीची पूजा केल्याने ज्ञानात भर पडते.
* पश्चिम दिशेला गुरु, महावीर स्वामी, भगवान बुद्धाची पूजा शुभ फळ देते.
* संबंध आणि जोडण्याची दिशा दक्षिण-पश्चिम मध्ये पितरांची पूजा करणे सुख आणि समृद्धी मिळवून देते.
 
आई लक्ष्मीची मूर्ती कशी असावी - 
लक्ष्मीचे असे चित्र आणावे ज्यामध्ये त्यांच्या एकीकडे श्री गणेश आणि दुसरी कडे देवी सरस्वती बसलेल्या असाव्यात आणि आई लक्ष्मी दोन्ही हाताने धनवर्षाव करत असतील, धनप्राप्तीसाठी असे चित्र लावणे शुभ असतं. जर आपण बसलेल्या लक्ष्मीचे चित्र आणत असाल तर त्या मध्ये लक्ष्मी लाल कपडे घालून कमळाच्या आसनावर बसल्या असतील, असे चित्र आणावे. 

आई सरस्वती, आई लक्ष्मी आणि गणपती यांचा दोन्ही बाजूस सोंड उंच केलेले हत्ती असावे. अश्या प्रकाराचे चित्राची पूजा केल्याने देवी लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरात वास्तव्यास असतील. लक्षात ठेवा की या चित्रात देवी लक्ष्मीचे पाय दिसता कामा नये, नाही तर लक्ष्मी घरात बऱ्याच काळ राहत नाही. म्हणून कमळावर बसलेली प्रसन्न असलेली देवी लक्ष्मीचे चित्रच सर्वोत्तम मानले आहे. चित्रामध्ये त्यांचा सह ऐरावत हत्ती असल्यास, तो आश्चर्यकारक आणि शुभ फळे देणार. 
 
आपल्या कडे श्री विष्णूंसह लक्ष्मीचे चित्र असल्यास आपण त्यांची पूजा देखील करू शकता. श्री हरींना आमंत्रण देऊन आई लक्ष्मीला घरात बोलवतात. भगवान विष्णूंसह घरात येणारी आई लक्ष्मी गरूड वाहनावर बसून येते, ज्याला शुभ मानतात.
 
चुकून देखील आई लक्ष्मीची अशी मूर्ती लावू नये -
* ज्या चित्रामध्ये देवी लक्ष्मी एकटीच असते असे चित्र दिवाळीच्या पूजेसाठी लावू नये. धर्म ग्रंथाच्यानुसार एकट्या लक्ष्मीच्या चित्राची पूजा न करता गणपती आणि सरस्वतीसह त्यांची पूजा करणं फायदेशीर असतं.
* लक्षात ठेवा की दिवाळीच्या पूजेमध्ये मातीचे लक्ष्मी -गणपतीची मूर्ती किंवा चित्र नवीन असावे. चांदीच्या मुरत्यांना स्वच्छ करून पुन्हा पूजेत घेऊ शकता. कधीही भंगलेले किंवा फाटक्या चित्राची पूजा करू नये.