शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (18:26 IST)

दिवाळीत या चुका टाळा, लक्ष्मी रुसली तर फजिती होईल

दिवाळी दरम्यान सकाळी उशीरापर्यंत झोपू नये. शास्त्रानुसार या दिवसांमध्ये ब्रह्म मुहूर्तात उठून सफाई करावी आणि अंघोळ करून देवाची आराधना करावी.
 
या दिवशी देवी लक्ष्मीसाठी अंघोळ केल्याशिवाय फुलं तोडू नये. तसेच देवीला ताजी फुलं अर्पित करावीत. 
 
या दिवशी घरातील वडिलधार्‍यांचा आशीर्वाद घेणे विसरू नका. तसेच कळत-नकळत त्यांचा अपमान करू नये. 
 
या दिवशी कुणासोबतही वाद घालणे टाळा. कुणालाही धोका देऊ नये. क्रोध करू नये.
 
या दिवसांमध्ये दुपारी झोपणे टाळावे. तब्येत खराब असल्यास किंवा गर्भावस्था असल्यास किंवा एखाद्या विशेष परिस्थिती वगळता दुपारी झोपू नये. निरोगी दुपारी झोप काढत असल्यास शास्त्रानुसार त्यांना दारिद्र्याला सामोरा जावं लागतं.
 
लक्ष्मी पूजन करताना घरातील दार बंद करून ठेवू नये. कारण जेथे देवीची आराधना, मंत्र-जप, स्तुती केली जाते तेथे लक्ष्मीचे आगमन होतं. या दिवशी चुकूनही नवर्‍याने बायकोशी भांडू नये. तसेच शारीरिक संबंध ठेवू नये.
 
या दरम्यान कोणालाही भेटवस्तू देताना मनात द्वेष भावना असू नये. दिवाळीला मद्यपानाचे सेवन करणे टाळावे. तसेच मांसाहारही टाळावे.
 
अनेक लोक या दिवशी जुगार खेळतात. याबद्दल वेगवेगळे मत असले तरी लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी या दिवशी जुगार खेळणे टाळावे.
 
या दिवशी दारावर आलेल्या कुणालाही रिकाम्या हाती किंवा उपाशी पोटी जाऊ देऊ नये. आपल्या सामर्थ्यानुसार व्यवहार करावा.