दिवाळीसाठी मुख्य दारावर वास्तुनुसार लावा तोरण, लक्ष्मी आकर्षित होईल

Last Modified बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (10:21 IST)
सनातन धर्मात भगवान गणेश आणि देवी महालक्ष्मीच्या आनंदाचा सण म्हणजे आश्विन अमावास्येला ला साजारा होणार सण दिवाळी. भगवान श्री विष्णूंच्या प्रिय असणाऱ्या महालक्ष्मीच्या स्वागतासाठीची तयारी बऱ्याच दिवसा पूर्वी सुरू होते. घर आणि व्यावसायिक संस्थान, कार्यालयाची स्वच्छता, रंग-रंगोटी केली जाते. त्या नंतर आपल्या घराला सजविण्याचे काम सुरू होते. दिवाळीवर देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी विविध प्रकाराचे तोरण मुख्य दारावर लावले जातात. जर आपण वास्तुच्या काही नियमांना लक्षात ठेवून रंग आणि दिशेनुसार तोरण बांधले, तर ते आपल्याला शुभ आणि चांगली फळ देतात आणि आनंद, यश आणि समृद्धी आपल्या जीवनात दार ठोठावते.

* तोरणाने आनंद येईल -
मुख्य दारावर बांधल्या जाणाऱ्या तोरणाला बंधनवार असे ही म्हणतात. देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि देवी आईला प्रसन्न करण्यासाठी दारावर हे बांधणे शुभ मानतात. हे बांधल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तोरण आपण ताज्या फुलांचे, प्लॅस्टिकच्या फुलांचे किंवा धातूचे देखील बनवू शकता. आजकाल बाजारपेठेत वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाइनचे तोरण मिळतात. तोरणांची निवड घराच्या दिशेनुसार, रंग आणि आकार लक्षात घेऊन लावल्याने नशीब वाढतं.

* पूर्वीकडे घराचे मुख्य दार असल्यास -
जर आपल्या घराचे दार पूर्वमुखी असल्यास तर हिरव्या रंगाचे फुलांचे आणि पानाचे तोरण लावणं सुख आणि समृद्धीला आमंत्रण देत. या दिशेत ताज्या आंब्याच्या आणि अशोकाच्या पानाचे तोरण लावल्यानं सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि लक्ष्मीची कृपा मिळते.

* उत्तरेकडे घराचे मुख्य दार असल्यास -
धनाची दिशा उत्तरेच्या मुख्य दारासाठी निळे किंवा आकाशी रंगांच्या फुलांचे तोरण लावावे. जर आपल्याकडे ताजे फुले नसल्यास आपण प्लस्टिकच्या फुलांचा वापर करू शकता. पण लक्षात ठेवा की फुले आणि पाने तुटलेले किंवा घाणेरडे नसावे. हे नेहमीच नकारात्मकता वाढवतात.

* दक्षिणेकडे घराचे मुख्य दार असल्यास -
जर घराचे मुख्य प्रवेश दार दक्षिणेकडे असल्यास तर लाल, नारंगी किंवा याचा सम रंगाने असलेले तोरण बांधावे. असे केल्याने घरात धनागमन होत आणि मान सन्मानात वाढ होते.

* पश्चिमेकडे घराचे मुख्य दार असल्यास -
घराचे मुख्य दार पश्चिमेकडे असल्यास मुख्य दारासाठी पिवळे, सोनेरी किंवा फिकट निळ्या रंगाच्या फुलांचे तोरण दारावर लावणं लाभ आणि प्रगतीस मदत करतं. लक्षात ठेवा की पूर्वी आणि दक्षिणे कडे असणाऱ्या दारावर कोणत्याही धातूचे तोरण लावू नये. पश्चिम आणि उत्तरे कडील दारावर धातूंचे तोरण लावू शकतो. अशा प्रकारे उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिशेत बनलेल्या प्रवेश दारावर लाकडाचे तोरण लावू शकतो, पण पश्चिम दिशेला लाकडाचे तोरण लावणे टाळावे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Nag Panchami 2021: नागपंचमी कधी आहे, शुभ मुहूर्त व पूजा

Nag Panchami 2021: नागपंचमी कधी आहे, शुभ मुहूर्त व पूजा विधी
यंदा इंग्रजी महिन्यानुसार, शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 रोजी शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ...

धर्म विज्ञानावर वर आधारित ; पुरातन देवळात दर्शन घेण्यास का ...

धर्म विज्ञानावर वर आधारित ; पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

चातुर्मासचे 10 नियम, 10 फायदे

चातुर्मासचे 10 नियम, 10 फायदे
उपवास: चातुर्मासाच्या चार महिन्यात उपवास ठेवावे. जमिनीवर झोपा: यादरम्यान फरशी किंवा ...

Shravan Somvar 2021 in Marathi श्रावण सोमवार तारखा आणि

Shravan Somvar 2021 in Marathi श्रावण सोमवार तारखा आणि महत्व
श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्याला ...

गणपती स्तोत्र मध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष

गणपती स्तोत्र मध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने
१. वक्रतुण्ड :- मद्रास राज्यातील कननूरजवळ २. एकदन्त :- पश्चिम बंगालमध्ये ...

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...