दिवाळीत वास्तू नियमानुसार रांगोळी बनवा, होईल लक्ष्मीची कृपा
दिवाळीचा सण जवळच येऊन टिपला आहे. प्रत्येक जण आपल्या घराला आपापल्यापरीने सजवतात आणि रचतात. काही पान-फुलांनी रांगोळी बनवतात, पण आपल्याला हे माहीत आहे का की जर आपण वास्तूंच्या नियमानुसार रांगोळीची दिशा आणि रंगांना लक्षात ठेवून बनवाल तर रांगोळी आणि त्याचे रंग आपल्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि सौख्य घेऊन येतात आणि वातावरणाला आनंदी करतात. रांगोळी काढल्याने जवळपास ची नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. घरावर देवी आणि देवांचा आशीर्वाद बनलेला राहतो. याच कारणास्तव आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ प्रसंगावर विविध रंगांचा वापर करून रांगोळी बनविण्याची प्रथा चालली आहे. शुभ मानली जाणारी रांगोळी गव्हाचे पीठ, तांदूळ, हळद-कुंकू, फुले-पाने किंवा विविध रंगांनी वेग-वेगळ्या डिझाइन मध्ये बनवतात.
अशी बनवा रांगोळी -
* पूर्वमुखी घर असल्यास मुख्य दारावर रांगोळी काढत असल्यास, घरात प्रेमळ वातावरणाच्या विकासासाठी आणि आदर आणि मान मिळविण्यासाठी अंडाकृती रांगोळी बनवावी. पूर्व दिशेमध्ये अंडाकृती डिझाइन जीवनात जीवनाच्या विकासासाठीचे नवे मार्ग बनवतात. या दिशेला रांगोळी बनवण्यासाठी सात्त्विक आणि ऊर्जा देणारे रंग जसे की लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, नारंगी या सारख्या रंगाचा वापर केल्यानं समृद्धी वाढते.
* उत्तरमुखी घर असल्यास उत्तर दिशेमध्ये लहरी किंवा पाण्याच्या गुणेशी साम्य असणारे डिझाइन बनवून आपण आपल्या जीवनात स्पष्टता आणि प्रगतीसाठी नवीन संधींना आमंत्रित करू शकतात. पिवळा, हिरवा, आकाशी आणि निळा रंगाचा वापर करणे शुभ मानतात.
* दक्षिण-पूर्व मध्ये त्रिकोण आणि दक्षिण मुखी घर असल्यास आयताकृती नमुन्याची रांगोळी काढणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. या दिशेला रांगोळीत रंग भरण्यासाठी आपण गडद लाल, नारंगी गुलाबी आणि जांभळा रंगाचा वापर करू शकता. अशा प्रकारे बनवलेली रांगोळी आपल्या जीवनात सुरक्षा, कीर्ती, आणि आत्मविश्वास वाढविण्यास मददगार असणार.
* जर आपले घर पश्चिम मुखी असल्यास सोनेरी आणि पांढऱ्या रंगाचा वापर करण्यासह वर्तुळाकार रांगोळी बनवा. पांढऱ्या आणि सोनेरी रंगांसह लाल, पिवळा, तांबडा, फिकट हिरवा या सारख्या रंगांना देखील वापरू शकता. इथे पंचकोणी आकाराची रांगोळी देखील बनवू शकता.