मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (10:06 IST)

सोप्या 15 वास्तू टिप्स, अमलात आणल्यास बदलेल आपलं आयुष्य

vastu tips
बऱ्याच वेळा घरात कोणत्याही कारणाशिवाय तणाव आणि भांडणे होतात. परस्पर संबंधामध्ये कटुता आणि उदासीनता येते. जर का आपणांस आपल्या घरात आणि आयुष्यात सुख आणि आनंद हवा असल्यास हे काही 15 उपाय करून बघा आणि त्याचे लाभ घ्या.
 
1 घरात आठवड्यातून एकदा गुगुळचे धूर करणे लाभकारी असते.
2 तुळसीचे 11 पाने आणि नागकेशराचे 2 दाणे धान्यात टाकून ठेवावे.
3 मोहरीच्या तेलाचा दिवा लावताना त्यात लवंगा टाकाव्यात.
4 तुळशीच्या रोपट्याला दर गुरुवारी दूध घालावे.
5 तव्यावर पोळी किंवा भाकरी करण्याआधी त्यावर दूध शिंपडावे.
6 पोळी किंवा भाकर करताना पहिली पोळी/ भाकर गायी च्या नावाने काढावी.
7 घरामध्ये 3 दार कधीही एकाच रेषेत नसावे
8 घरामध्ये कधीही वाळलेली फुले ठेऊ नका.
9 घरात अडगळीच्या वस्तू, तुटलेल्या वस्तू ठेऊ नका.
10 घराच्या बैठकीत आशीर्वाद देतानाचे संतांचे चित्र लावावे.
11 दक्षिण पूर्व दिशेचा कोपऱ्यात हिरवळीचे चित्र लावावे.
12 घरात ठिबकणारे नळ नसावे. असे असल्यास त्वरित बदलावे.
13 घरात गोल कडांचे फर्निचर असावे.
14 तुळस पूर्व दिशेस पूजास्थळी किंवा गॅलरीत ठेवणे.
15 वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे पाण्याचा निचारा असावा. हे आर्थिकदृष्टीने शुभ असते.