गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (10:25 IST)

येथे पैसे ठेवल्यानं जाणवते पैशांची चणचण, लगेच जागा बदला

वास्तू आणि ज्योतिषानुसार पैसे किंवा दागिने ठेवण्यासाठी योग्य दिशा असतात. जर आपण योग्य दिशेला पैसे ठेवल्यास आपले पैसे वाढतील आणि बरकत राहील. जर पैसे योग्य दिशेला ठेवले नाही तर पैसे कमी होतील आणि कर्ज वाढेल. चला तर मग जाणून घेऊ या पैसे ठेवण्याची योग्य दिशा.
 
या जागी पैसे ठेवू नये -
* दक्षिण -पूर्व च्या मधली दिशेला आग्नेय कोन म्हणतात. या ठिकाणी धन किंवा पैसे ठेवल्यानं पैसे कमी होतात. उत्पन्ना पेक्षा जास्तच खर्च होतो. या मुळे कर्जाची स्थिती बनलेली राहते. या नंतर जर पैसे दक्षिणे कडे ठेवल्यास नुकसान तर होतं नाही पण पैशात वाढ पण होतं नसते.
 
* दक्षिण आणि पश्चिमच्या मधली दिशा नैऋत्य कोन म्हणवली जाते. असं म्हणतात की या दिशेला पैशे आणि दागिने तेच ठेवतात ज्याने चुकीच्या मार्गाने पैसे कमावले आहेत. म्हणजे परिश्रमाचे कमी असणे. असं म्हणतात की इथे पैसे टिकतात पण त्या पैशांचे कधी काय होईल सांगता येत नाही. 
 
* पश्चिमे कडे पैसे आणि दागिने ठेवल्यानं कोणताही विशेष फायदा होतं नाही. असे मानतात की या दिशेला पैसे ठेवल्यानं फार कष्टाने घरात पैसे येतात. पश्चिम आणि उत्तेरच्या मधली दिशा वायव्य कोन म्हणवते इथे पैसे किंवा धन ठेवल्यानं घराचे अर्थसंकल्प नेहमीच गडबडतात आणि माणूस नेहमी कर्ज आणि कर्जदारांमुळे त्रस्त राहतो. उत्पन्न मिळवायला फार त्रास होतो.
 
या जागी धन ठेवा -    
* धन ठेवण्यासाठी उत्तर दिशा सर्वात शुभ मानली आहे. कारण उत्तर दिशेचे स्वामी धनाचे देव कुबेर आहे. घराचा या दिशेला पैसे आणि दागिने ज्या कपाटात ठेवतात, ते कपाट घराच्या उत्तर दिशेच्या खोलीत दक्षिणेचा भिंतीला लागून ठेवावे. अशा प्रकारे ठेवल्यानं कपाट उत्तर दिशेला उघडेल, त्या मधील ठेवलेले पैसे आणि दागिने नेहमी वाढतं राहतील. 
 
* उत्तर आणि पूर्वेच्या मधली दिशा ईशान्य कोन म्हणवते. असं म्हणतात की या दिशेला पैसे, धन आणि दागिने ठेवणारा घराचा प्रमुख बुद्धिमान मानला जातो. असं ही मानतात की जर ते उत्तर ईशान्य मध्ये ठेवलेले असेल तर घराची एक कन्या आणि पूर्व ईशान्य मध्ये ठेवलेले असल्यास तर मुलगा बुद्धिमान आणि प्रख्यात होतो.
 
* पूर्व दिशेला घराची संपत्ती आणि तिजोरी ठेवणे शुभ असतं आणि त्यामध्ये वाढच होतं राहते.