1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. गुजरातमध्ये पटेलांनी दाखवली ताकद (फोटो)

गुजरातमध्ये पटेलांनी दाखवली ताकद (फोटो)

gujarat
गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण (ओबीसी) द्यावे अशी मागणी जोर धरत असून २२ वर्षीय हार्दिक पटेल या समाजाचे नेतृत्व करत आहे. मंगळवारी अहमदाबाद येथे पटेल समाजाच्या आरक्षणासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत लाखो नागरिक सहभागी झाले असून या विशाल रॅलीत हार्दिक पटेलने गुजरातमधील भाजपा सरकारला इशाराच दिला आहे. गेल्या १० वर्षात गुजरातमध्ये सहा हजार शेतक-यांनी आत्महत्या केली आता आत्महत्या झाली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही पटेल यांनी म्हटले आहे.
 
देशातील तरुण आंदोलनाच्या माध्यमातून हक्क मागत असेल व त्याला त्याचे हक्क मिळत नसतील तर त्यातूनच नक्षलवाद जन्माला येतो असेही पटेल यांनी नमूद केले. गुजरातमध्ये पटेल समाजाचे वर्चस्व असून गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच भाजपाविरोधात एवढे मोठे आंदोलन होत आहे.