नाराज आहे, पण राजीनामा देणार नाही : मारिया
मुंबई- तडकाफडकी बदली झाल्याने नाराज असलेले राकेश मारिया यांनी आपण राजीनामा देणार नाही, अशी माहिती एका खासगी वृत्तवाहिनीकडे दिली आहे. त्यामुळे मारिया यांच्या राजीनामा देण्याच्या चर्चा आता थंडावल्या आहे.
अशा प्रकारच्या बदलीमुळे आपण नाराज आहोत, सणांचा काळ संपेपर्यंत तरी बदली होणार नाही, असे वाटले होते, अशी प्रतिक्रिया मारिया यांनी निकटवर्तियांकडे व्यक्त केली होती. तसेच, पीटर मुखर्जी यांच्याशी असलेल्या संबंधांबाबतच्या आरोपांचाही त्यांनी इन्कार केला. थेट प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी कुणाचे फोन घेणेही टाळले आणि जावेद अहमद यांच्याकडे पदाची सूत्रे देण्याची औपचारिकता पाळण्यासाठीही न थांबता मारिया यांनी दुपारी तडकाफडकी पोलीस मुख्यालय सोडले. यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती.