1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (11:23 IST)

भाजप-सेना पुन्हा ‘भाई-भाई’?

शिवसेनेसह मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचाली

bjp
महाराष्टातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १ डिसेंबरपूर्वी होणार असून शिवसेनाच आपला ‘मित्र’पक्ष असल्याचे भाजपने म्हटले आहे. दिल्ली आणि मुंबईत वेगाने सुरु असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता शिवसेनेसह मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि प्रदेशाध्यक्षपदाविषयी चर्चा झाली.  नागपुरात होणाºया हिवाळी अधिवेशनापूर्वी लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्यावर एकमत झाल्याचे समजते.