शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (08:17 IST)

महिलांनो सावधान; रिक्षा प्रवासात महिलेचे एक लाखाचे दागिने लंपास

Jewellery
नाशिक : रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पिशवीतील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पूनम विक्रम जखवाडे (वय44, रा. श्री संकुल अपार्टमेंट, जेलरोड, नाशिकरोड) ही महिला दि. 18 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता रिक्षाने प्रवास करीत होती.
 
ही महिला पेठ रोडवरील भक्तिधामजवळ असलेल्या मारुती मंदिराजवळ प्रवास करीत असताना तिच्याजवळ असलेल्या कापडी पिशवीतील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोकड असा ऐवज रिक्षातील सहप्रवाशाने चोरून नेला.
 
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor