1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (08:13 IST)

नाशिक :सैन्य दलाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

An assistant police inspector died after being hit by a car in front of the army's petrol pump at Deolali camp in Nashik district
नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प येथील लष्करी छावणी जवळ असलेल्या सैन्य दलाच्या पेट्रोल पंपा समोर सैन्य दलाच्या गाडीने धडक दिल्यामुळे एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना  घडली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरापासून जवळ असलेल्या आणि नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या वडनेर गेट या लष्करी छावणी जवळ असलेल्या सैन्य दलाच्या पेट्रोल पंपा समोर सैन्य दलाच्या ट्रकने आपली ड्युटी संपवून घरी जात असलेल्या नाशिक पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या गाडीला धडक दिली.
 
या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना सैन्य दलाच्या या ट्रक चालकाने तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच कुंदन सोनवणे यांचे निधन झाले होते.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor