1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Six people died in an accident in Nagpur

Accident: नागपुरात लग्नाच्यावऱ्हाडावर काळाचा घाला, सहा जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात काटोल येथे क्वालीस आणि ट्रक ची धडक होऊन अपघात झाला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. 
नागपुरातून लग्न समारंभातून काही वऱ्हाडी  काटोलला जात असताना काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडीच्या दरम्यान ट्रक ची क्वालीस कारला  धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
क्वालीस कारला ट्रक ने धडक दिली. ही  धडक एवढी जोरदार होती. की  गाडीचा चक्काचूर झाला आहे. या वाहनात बसलेले सात जण नागपुरातून एका लग्न समारंभातून काटोलच्या दिशेने जात असताना मध्यरात्री हा अपघात झाला. 

घटनेची माहिती पोलिसांना कळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले असून जखमीला रुग्णालयात दाखल केले असून पोलीस पुढील तपास करत आहे.  
 
Edited by - Priya DIxit
 
पुढील लेख
Rohit Sharma : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याने चाहते संतापले