1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2023 (11:18 IST)

नागपुरात कार आणि ट्रकची भीषण धडक, 3 जणांचा मृत्यू, 6 जखमी

Accident
Nagpur Accidnet महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात भरधाव कारने पार्क केलेल्या कंटेनर ट्रकला धडक दिल्याने तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले. नागपूर जिल्हा मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असलेल्या अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-भंडारा रस्त्यावर रविवारी सायंकाळी हा अपघात झाला.
 
ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात
अरोली पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रक चालकाने कोणतेही फलक न लावता निष्काळजीपणे वाहन रस्त्यावर उभे केले होते. त्याच्या दुर्लक्षामुळे इतर वाहनधारकांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली होती.
 
अपघातात कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले
मागून येणारी एक कार ट्रकवर आदळली आणि समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे कारमधील पाच मुलांसह नऊ जण गंभीर जखमी झाले.
 
पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले
पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णालयात नेले जिथे तिघांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. ट्रकचालकाविरुद्ध संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.