सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2023 (07:45 IST)

लोणावळ्यात खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

Two tourists died after drowning in a mine लोणावळा :लोणावळा शहरालगत असलेल्या वरसोली गावाजवळील खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. .
 
प्रियांक पानचंद व्होरा (वय 35, रा. पवई मुंबई) व विजय सुभाष यादव (वय 35, रा. घाटकोपर, मुंबई) अशी या बुडून मयत झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई भागातील सहा जणांचा ग्रुप लोणावळा परिसरात वर्षा विहारासाठी आला होता. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते वरसोली गावातील माळाकडे फिरायला गेले होते. त्याठिकाणी असलेल्या पाण्याच्या खाणीत प्रियांक, विजय व जेनिया वियागस हे तिघे उतरले असता पाय घसरल्याने ते तिघेही पाण्यात पडले. त्यावेळी त्याचे इतर सहकारी व स्थानिकांनी लागलीच त्यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, नाकातोंडात पाणी गेल्याने प्रियांक व विजय यांचा मृत्यू झाला.
 
शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शन पोलीस नाईक किशोर पवार करत आहेत.